62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, या कलाकारांचा झाला सन्मान
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी (9 सप्टेंबर) रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात पार पडला. या पुरस्कारांमध्ये छबिला या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला, तर ‘घरत गणपती’ द्वितीय स्थानी तर ‘नाच गं घुमा’ तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला.
भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार, संगीत दिग्दर्शक व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
अभिनेत्री डॉ. राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
Comments are closed.