हातात हात अन् हास्यविनोद, मोदी-पुतीन-जिंगपिंग BRICS मध्ये एकत्र येत जगाला दिला संदेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (12 सप्टेंबर) नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान एकत्र आले आणि याची जगभर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याचसोबत, भारताने अमेरिकेसह अनेक देशांना एक मजबूत संदेश दिला असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. दिल्लीतील 2 दिवसीय कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसारख्या 21 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
Comments are closed.