पुण्यात गणेश भेळचा अनोखा उपक्रम; पाणीपुरींपासून साकारली बाप्पाची 13 फूटी मूर्ती




पुण्यातील गणेश भेळने फर्ग्युसन रस्त्यावरील आपल्या दुकानाबाहेर 21 हजार पाणीपुरींचा वापर करून 13 फूटी गणपती बाप्पाची मूर्ती साकारली


पुणे : आजपासून (14 सप्टेंबर) गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यामुळे राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सार्वजनिक मंडळात मनमोहक रुपात गणपती बाप्पा विराजमान होत असतो. तर काही ठिकाणी गणपती मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात येतो. यंदा पुण्यातील गणेश भेळने पाणीपुरीपासून गमपती बाप्पा साकारला असून पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.



Comments are closed.