Office Desk Vastu: पॉसिटीव्ह एनर्जीसाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा या वस्तू
ऑफिसमध्ये सकाळी बसल्यापासून संध्याकाळपर्यंत सतत एकाच डेस्कवर काम, समोर कॉम्प्युटरची स्क्रीन, आजूबाजूला फाइल्स आणि कामाचा वाढता ताण अशा वातावरणात दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटणं कधी कधी कठीण होतं. तुमचा बराचसा वेळ ज्या डेस्कवर जातो, ती जागा थोडी व्यवस्थित आणि प्रसन्न ठेवली तर कामाचा अनुभवही अधिक आरामदायी वाटू शकतो. तुम्हालाही ऑफिस डेस्कवर अशा वस्तू ठेवायच्या असतील, तर ‘या’ 5 गोष्टी नक्की ट्राय करू शकता.
लकी बांबू
लकी बांबूला फेंगशुईमध्ये शुभ मानलं जातं. डेस्कवर छोट्या कुंडीत हे रोप ठेवल्याने जागेला हिरवाई आणि फ्रेश लुक मिळतो. तीन किंवा नऊ काड्यांची रचना शुभ मानली जाते.
क्रिस्टल कासव
कासव हे स्थिरता आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. छोटं क्रिस्टल कासव डेस्कवर सजावटीसाठी ठेवू शकता. त्याची दिशा निवडताना वास्तू किंवा फेंगशुईच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या मान्यता आहेत.
लाफिंग बुद्ध
हसऱ्या बुद्धाची छोटी मूर्ती ऑफिस डेस्कला आकर्षक लूक देऊ शकते. फेंगशुईच्या मान्यतेनुसार ती आनंद आणि समृद्धीशी जोडली जाते.
क्रिस्टल बॉल
इंद्रधनुषी क्रिस्टल बॉल डेस्कवर ठेवल्यास प्रकाशाच्या प्रतिबिंबामुळे जागा अधिक सुंदर दिसते. फेंगशुईमध्ये त्याला सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाते.
मनी प्लांट/स्नेक प्लांट
छोटं इनडोअर रोप डेस्कला फ्रेश लुक देतं. मात्र रोपं हवा शुद्ध करण्यासाठी ठेवत असाल तर एका छोट्या ऑफिस डेस्कवर त्याचा परिणाम मोठा असेलच असं नाही. तरी हिरवाईमुळे जागा अधिक आरामदायी वाटू शकते.
Comments are closed.