इको-फ्रेंडली शो-पीसेसने सजवा घराचा कोपरा

प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा माती, बांबू आणि लाकडापासून बनवलेले इको-फ्रेंडली शो-पीसेस घराची शोभा दुपटीने वाढवतात. यामुळे घराला एक नॅचरल आणि ट्रेन्डी लुक मिळतो. तसेच स्थानिक कारागिरांनाही आर्थिक मदत मिळते. आज आपण घराचा कोपरा इको-फ्रेंडली पद्धतीने कसा सजवता येईल यासंदर्भातील टिप्स पाहूयात.

बांबू आणि ज्यूट – बांबूपासून बनवलेले छोटे वॉल हँगिंग्ज, बास्केट्स आणि ज्यूटच्या वॉल आर्टमुळे घराला  अस्थेटिक लूक मिळतो.

टेराकोटा – मातीच्या सुंदर मूर्ती, टेराकोटाची कुंडी किंवा मातीचे दिवे घराच्या कोपऱ्याला एथनिक लुक देतात.

नारळाच्या कवटीच्या वस्तू – नारळाच्या सुक्या कवटीपासून बनवलेले कॅन्डल होल्डर्स, कप घराला आकर्षक लूक देतात.

हस्तकला – जुन्या लाकडाचे तुकडे, टाकाऊ कागदाचा लगदा  यापासून तयार केलेले हँडमेड शो-पीसेस तुम्ही घरात ठेवू शकता.

फायदे

  • फायबर आणि प्लॅस्टिकमधून बाहेर पडणाऱ्या केमिकलच्या संपर्कात येत नाही.
  • स्थानिक हस्तकला आणि ग्रामीण कलाकारांना आर्थिक मदत होते.
  • या वस्तू टिकाऊ असतात आणि खिशालाही परवडणाऱ्या असतात.

हेही वाचा – हॉटेल ऐवजी होमस्टे का बरा?

Comments are closed.