कमी वेळेत तयार होणारे पदार्थ

नोकरी-व्यवसायाच्या गडबडीत रोज काय नवीन आणि झटपट बनवायचे, हा गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. अशा वेळी अनेकदा हॉटेलचे खाणे किंवा झटपट तयार होणारे जंक फूड ऑर्डर केले जाते. मात्र, आपल्या पारंपरिक मराठी पाककृतींमध्ये असे अनेक पदार्थ आहेत, जे अवघ्या 15  ते 20 मिनिटांत तयार होतात आणि आरोग्यासाठीही उत्तम असतात.

कांदे पोहे आणि उप्पीट

सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळची छोटी भूक, पोहे आणि उप्पीट हा सर्वांत सोपा पर्याय आहे. कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून 5 ते 10 मिनिटांत गरमागरम पोहे तयार होतात. हा पदार्थ पचनास हलका देणारा आहे.

फोडणीचा भात

रात्रीचा भात उरला असल्यास किंवा घाईच्या वेळी ताज्या भाताला मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद आणि कोथिंबिरीची फोडणी देऊन चमचमीत फोडणीचा भात बनवता येतो.

थालीपीठ

थालीपीठ हा पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे. पीठात कांदा, कोथिंबीर, तिळ आणि थोडे तिखट-मीठ कालवून तव्यावर थापून 10 मिनिटांत खमंग थालीपीठ तयार होते. थालीपीठ दही किंवा लोण्यासोबत चविष्ट लागतात.

ताकाची कढी आणि खिचडी

संध्याकाळी थकवा आल्यावर हलके आणि गरमागरम खावेसे वाटल्यास मूग डाळ-तांदळाची खिचडी आणि ताकाची खमंग कढी हा उत्तम पर्याय आहे. अवघ्या 15 मिनिटांत  हे दोन्ही पदार्थ तयार होतात.

सुकी बटाटा भाजी आणि चपाती

उकडलेल्या बटाट्यांपासून जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून 5 मिनिटांत सुकी भाजी तयार होते. ही भाजी आणि गरमागरम चपाती डब्यासाठी बनते.

हेही वाचा – फोडलेला नारळ खराब होण्याची भीती? या ट्रिक्सने महिनाभर ठेवा ताजे

Comments are closed.