पुण्याच्या 5 मानाच्या गणपतींना पुणेकरांनी दिला जड अंतःकरणाने निरोप, पहा हे फोटो
पुणे : गेल्या 11 दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला. शुक्रवारी (25 सप्टेंबर) ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत बाप्पाला निरोप दिला गेला. यादिवशी खास आकर्षण असले ते पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचे. कारण, या ५ मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे सर्वोच्च महत्त्व आहे. विसर्जन मिरवणुकीत वर्षांनुवर्षे चालत आलेला पाच मानाच्या गणपतींचा क्रम काटेकोरपणे पाळला जातो. यानुसार, यंदाच्या वर्षीही शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन पार पडले.
Comments are closed.