केमिकलने पिकवलेली केळी ओळखण्याच्या सोप्या पद्धती
केळी हे पौष्टिक फळ आहे. मात्र, सध्या बाजारात जास्त नफा मिळवण्यासाठी आणि केळी लवकरात लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या धोकादायक केमिकलचा सर्रास वापर केला जात आहे. अशी केमिकलयुक्त केळी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन पोटदुखी, अपचन यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बाजारात केळी खरेदी करताना नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी कशी ओळखावी, याच्या काही सोप्या जाणून घेऊयात.
- नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा पिवळा रंग थोडा फिकट असतो आणि त्यावर काळे, तपकिरी रंगाचे लहान डाग दिसतात.
- केमिकलयुक्त केळी गडद पिवळी आणि चकचकीत दिसतात. यावर सहसा कोणतेही डाग नसतात किंवा ती सर्व बाजूंनी एकसारखी पिवळी दिसतात.
- जर केळीचा संपूर्ण भाग पिवळा असेल पण तिचे देठ हिरव्या रंगाचे असेल, तर ती केळी केमिकलचा वापर करून पिकवलेली असण्याची शक्यता जास्त असते. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठही पिवळसर किंवा काळे पडलेले असते.
- केमिकलने पिकवलेली केळी वरून पिवळी आणि मऊ दिसत असली, तरी आतून ती कच्ची किंवा टणक राहतात. अशी केळी खाताना ती थोडी कडवट किंवा अळणी लागतात. याउलट नैसर्गिक केळी आतून आणि बाहेरून समान मऊ व गोड असतात.
- केळी केमिकलने पिकवली आहे की नाही हे तपासण्यासाठी ती पाण्यात टाकून पाहा. जर केळी पाण्यात बुडाली तर ती नैसर्गिकरीत्या पिकलेली असते. जर केळी पाण्यावर तरंगत राहिलीतर ती केमिकल वापरून पिकवलेली असण्याची शक्यता असते.
हेही वाचा – चिप्स-नमकीनऐवजी मखाना; हेल्दी स्नॅक म्हणून वाढतेय पसंती
Comments are closed.