रात्री निवांत क्षण हवाय? नाईट बाल्कनी गार्डनसाठी वापरा या भन्नाट आयडीयाज





दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री बाल्कनीत बसून निवांत वेळ घालवणे हा एक वेगळाच आनंद असतो. योग्य लाईटिंग, सुवासिक फुले आणि चंद्राच्या प्रकाशात चमकणाऱ्या वनस्पतींची निवड करून तुम्ही तुमच्या बाल्कनीचे रूपांतर रात्रीही सुंदर दिसणाऱ्या एका लहानशा बागेत करू शकता.

नाईट बाल्कनी गार्डन –

रात्री फुलणाऱ्या वनस्पती

  • रात्रराणी, मोगरा यांसारखी रोपे लावावी. रात्रीच्या वेळी त्यांचा सुगंध बाल्कनी प्रसन्न करेल.
  • पांढरा पारिजातक, पांढरा सदाफुली ही फुले चंद्राच्या प्रकाशात चमकतात.
  • मनी प्लँट, स्नेक प्लँट, एरिका पाम यांसारखी चमकदार पाने असलेली रोपे लाईटच्या प्रकाशात आकर्षक दिसतात.

आकर्षक प्रकाशयोजना

  • कुंडीमध्ये लावण्यासाठी छोटे सोलर स्टेक लाईट्स वापरा. हे दिवसभर उन्हात चार्ज होतात आणि रात्री आपोआप लागतात.
  • बाल्कनीच्या ग्रीलवर वॉर्म व्हाईट फेअरी लाईट्स गुंडाळा.
  • बाल्कनीच्या कोपऱ्यात किंवा टेबलवर छोटे अँटीक कंदील ठेवता येईल.

बसण्याची सोय

  • छोटी लाकडी फोल्डिंग खुर्ची आणि टेबल ठेवा.
  • जागेची कमतरता असल्यास वॉटरप्रूफ मॅट, काही रंगीबेरंगी उशा ठेवता येईल.

सजावटीच्या वस्तू

  • बाल्कनीच्या कोपऱ्यात पांढरे खडे टाकावेत.
  • बाल्कनीत छोटा विंड चाइम लावू शकता.

या सोप्या उपायांनी तुमची बाल्कनी रात्रीच्या वेळी शांत आणि निवांत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम जागा बनेल.

हेही वाचा – इस्त्रीच्या तळाशी पडलेले काळे डाग असे घालवा



Comments are closed.