जगातील सर्वात लांब महामार्ग, या प्रवासात लागत नाही एकही वळण
प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येकालाच लांब पल्ल्याच्या सफरी खुणावत असतात. पण जगात एक असा महामार्ग आहे जो पार करण्यासाठी तब्बल दोन महिने लागतात आणि विशेष म्हणजे या 30000 किलोमीटरच्या संपूर्ण प्रवासात एकही यू-टर्न घ्यावा लागत नाही. हा जगातील सर्वात लांब महामार्ग कुठे आहे? या महामार्गाचे नाव काय आहे? जाणून घेऊयात सविस्तरपणे,
रस्त्याचे वैशिष्ट्य
‘पॅन-अमेरिकन हाईवे’ (Pan-American Highway) असे या महामार्गाचे नाव असून, हा जगातील सर्वात लांब रस्ता मानला जातो. याची एकूण लांबी जवळपास ३०,००० किलोमीटर आहे. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 500 किलोमीटर वेगाने गाडी चालवली, तरीही हा संपूर्ण रस्ता पार करण्यासाठी सुमारे 60 दिवसांहून अधिक काळ लागू शकतो.
एकही यू-टर्न नाही
या रस्त्याचे सर्वात मोठे आणि अचंबित करणारे वैशिष्ट्य म्हणजे, या महामार्गावर तब्बल 30 हजार किलोमीटरपर्यंत एकही मोठा वळण किंवा यू-टर्न नाही.
कुठून कुठपर्यंत रस्ता?
हा महामार्ग उत्तर अमेरिका खंडातील अलास्का येथील प्रुधो बेपासून सुरू होतो आणि दक्षिण अमेरिकेच्या टोकावर असलेल्या अर्जेंटिना येथील ‘उशुआिया’ शहरापर्यंत पोहोचतो.
14 देशांमधून प्रवास
हा महामार्ग 14 देशांमधून जातो. मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरास, निकाराग्वा, कोस्टा रिका आणि पनामा यासह प्रमुख उत्तर अमेरिकन राष्ट्रांना व्यापतो. तो कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली आणि अर्जेंटिनामधून दक्षिण अमेरिकेत जातो. महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग स्पॅनिश भाषिक देशांमधून जातो. म्हणून वाटेत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांना किमान काही मूलभूत स्पॅनिश भाषा शिकण्यास प्रोत्साहित केलं जातं.
हेही वाचा – हॉटेल ऐवजी होमस्टे का बरा?
Comments are closed.