ऑक्टोबर हीटपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यापूर्वीच्या दिवसांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होतो. पाऊस कमी झाल्यामुळे हवेत प्रचंड दमटपणा आणि उकाडा वाढतो, ज्याला आपण ऑक्टोबर हीट असं म्हणतो. या दिवसांत उन्हामुळे अंगाची लाही लाही होते, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. त्यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
भरपूर पाणी
दमट वातावरणामुळे शरीरातील घाम लवकर बाहेर पडतो, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. म्हणून दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. तसेच लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा जिरे पाणी यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करावा.
योग्य कपडे
या दिवसात घाम शोषून घेणारे सुती आणि सैलसर कपडे घालावेत. गडद रंगाचे कपडे उष्णता जास्त शोषून घेतात, त्यामुळे शक्यतो पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपडे घालावेत. घट्ट जीन्स किंवा नायलॉनचे कपडे टाळावे.
हलका आहार
ऑक्टोबर हीटचा त्रास होऊ नये यासाठी जेवणात कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री आणि मोसंबी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करावा.
दुपारी बाहेर जाणे टाळा
दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास छत्री, सनग्लासेस आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
स्वच्छता
घामामुळे त्वचेवर बॅक्टेरिया साचतात, ज्यामुळे खाजेची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ करावी.
हेही वाचा – मासिक पाळीत स्विमिंग करणे कितपत सुरक्षित?
Comments are closed.