रोज चहा-कॉफी पिणाऱ्यांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात

सकाळचा गरमागरम चहा किंवा कामाच्या मध्ये एक कप कॉफी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच याशिवाय होत नाही. थकवा आला की चहा, कामाचा ताण वाढला की कॉफी आणि मित्रांसोबत गप्पा मारतानाही हातात चहा- कॉफीचा कप. चहा-कॉफी पूर्णपणे सोडण्याची गरज नसली तरी ती किती, कधी आणि कशी घेतो याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

1) प्रमाणाकडे लक्ष द्या

दिवसभरात वारंवार चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असेल तर एकूण कॅफीनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी कप वाढवण्याऐवजी आपल्या सेवनावर लक्ष ठेवणे योग्य ठरते.

2) साखर कमी

चहा किंवा कॉफीमध्ये जास्त साखर घालण्याची सवय असेल तर हळूहळू तिचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा. चवीसाठी साखरेवर अवलंबून राहण्याऐवजी कमी गोड चहाची किंवा कॉफीची सवय लावता येते.

3) रात्री टाळा

चहा आणि कॉफीमधील कॅफीन काही लोकांच्या झोपेवर परिणाम करू शकते. विशेषतः संध्याकाळनंतर चहा किंवा कॉफी घेतल्यावर झोप उशिरा येत असेल, तर त्याची वेळ बदलून पाहा.

4) रिकाम्या पोटी घेता?

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेण्याची सवय अनेकांना असते. त्याऐवजी आधी पाणी प्या आणि शक्य असल्यास काही हलकं खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी घ्या.

5) पाणी पिणे

चहा-कॉफी घेतो म्हणून दिवसभरातील पाण्याचं सेवन कमी होऊ देऊ नका. तहान लागण्याची वाट न पाहता दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय ठेवा.

6) कॅफीनचे प्रमाण

काही लोकांना चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर अस्वस्थता, हृदयाची धडधड, अॅसिडिटी किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. अशी लक्षणं वारंवार जाणवत असल्यास कॅफीनचे प्रमाण कमी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.

फक्त चहा किंवा कॉफीवर थकवा घालवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल आणि पुरेसं पाणी यांनाही तितकंच महत्व देणं गरजेचं आहे.

Comments are closed.