डेस्कवरच मिळवा मानसिक शांतता; करा माइंडफुलनेसचा वापर

सध्याच्या डिजिटल युगात आणि धावपळीच्या रुटीनमध्ये 9 ते 5 ची नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी मानसिक ताण किंवा डोकं जड होण्याचा त्रास जाणवतो. प्रोजेक्ट्सची डेडलाइन, कामाचं प्रेशर आणि सततचे ईमेल यामुळे मेंदू थकल्यासारखा वाटू लागतो. अशा वेळी तासनतास ध्यान करणं शक्य नसतं. परंतू तुम्ही ऑफिसच्या डेस्कवर बसूनच माइंडफुलनेसच्या साध्या पद्धती वापरल्या तर हा ताण चुटकीसरशी दूर होऊ शकतो. कसा ते जाणून घेऊयात

माइंडफुलनेस म्हणजे काय?

माइंडफुलनेस म्हणजे भूतकाळ किंवा भविष्याच्या विचारांत न अडकता अगदी सध्याच्या क्षणात जगणं आणि पूर्ण एकाग्रतेनं काम करणं.

श्वास तंत्र

ताण वाढल्यास खुर्चीवर ताठ बसा. दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंद श्वास रोखून ठेवा. आता हळूहळू सोडा. ही प्रक्रिया सलग 3 ते 5 वेळा केल्यास शरीरातील ताण कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो.

डिजिटल ब्रेक

दर दोन तासांनी 5 मिनिटांसाठी स्क्रीनपासून दूर जा. खुर्चीवरून उठून थोडी मान आणि हाताची हलकी स्ट्रेचिंग करा.

एक वेळी एकच काम

एकाच वेळी ईमेल चेक करणं, मीटिंग अटेंड करणं आणि रिपोर्ट बनवणं यामुळे स्ट्रेस येतो. त्याऐवजी एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे कामही वेळेत होते आणि ताण टळतो.

पाण्याचा वापर

जेव्हा कधी तुम्हाला टेन्शन जाणवेल, तेव्हा एक ग्लास थंड पाणी आणा. घाईघाईने पिण्याऐवजी पाण्याचा प्रत्येक घोट सावकाश घ्या. पाण्याचा थंडपणा आणि घशातून उतरण्याचा अनुभव घ्या. ही साधी सवय देखील मेंदूला लगेच रिफ्रेश करतं.

हेही वाचा – झोपताना उशीची उंची किती असावी?

Comments are closed.