पॅकबंद मसाले घेण्यापूर्वी पॅकेटवर नक्की तपासा या गोष्टी





भारतीय जेवणाची चव मसाल्यांशिवाय अपूर्ण आहे. कोणत्याही भाजीला, आमटीला किंवा पदार्थाला खमंग सुवास आणि चव आणण्यासाठी आपण आवर्जून विविध मसाल्यांचा वापर करतो. पण तुम्ही रोज जेवणात वापरत असलेले हे मसाले खरोखरच शुद्ध आहेत का? बाजारात मिळणाऱ्या अनेक पॅकबंद मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे मसाले खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पॅकेट विकत घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ते पाहूया.

सर्वप्रथम, पॅकेटवरील FSSAI (अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) चा परवाना आणि लोगो तपासावा. ज्या पाकिटांवर हा परवाना असतो, ती उत्पादने अन्नसुरक्षेच्या मानकांवर खरी उतरलेली असतात.

दुसरे म्हणजे, उत्पादन आणि एक्सपायरी डेट तपासायला हवे. जुन्या मसाल्यांचा स्वाद आणि सुवास कमी झालेला असतो. तसेच ते आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसतात.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यातील घटक. मसाल्यामध्ये नेमके कोणते घटक वापरले आहेत आणि त्यात कोणती प्रिझर्वेटिव्ह मिसळली आहेत का, हे पाहावे. अनेकदा स्वस्त मसाल्यांमध्ये रंग आणि स्टार्चची भेसळ केली जाते.

मसाल्याचे पॅकेजिंग पूर्णपणे हवाबंद असावे. जर पाकीट कुठेही ओलसर किंवा फाटलेले असेल, तर त्यात हवा जाऊन ओलावा निर्माण होऊ शकतो आणि बुरशी किंवा किडे होऊ शकतात. .

थोड्याफार पैशांच्या बचतीसाठी उघड्यावर विकले जाणारे मसाले विकत घेणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

हेही वाचा – चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा या हेल्दी पेयांचे सेवन



Comments are closed.