दिवसातून काही क्षण मनमोकळ हसल्याने आरोग्याला होतात हे आश्चर्यकारक फायदे!
धावपळीच्या आणि ताणतणावाने भरलेल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा हसणे किंवा खूश राहणे विसरून जातो. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते दिवसातून काही क्षण मनमोकळं हसणं हे आरोग्यासाठी एक उत्तम औषध मानले जाते. हसल्याने ताण कमी होतो हे आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर नेमके काय परिणाम होतात, ते जाणून घेऊयात.
हसण्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन्स) ची पातळी कमी होते आणि आनंदी राहण्यास मदत करणारे एन्डॉर्फिन्स (हॅपी हार्मोन्स) रिलीज होतात. यामुळे स्ट्रेस, चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते. तसेच, मनमोकळेपणाने हसल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय, हसताना पोटाच्या स्नायूंवर जोर येतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे अनेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते. चेहरा आणि शरीराचे स्नायू रिलॅक्स झाल्यामुळे रात्री गाढ आणि शांत झोप लागण्यासही मदत होते.
थोडक्यात सांगायचे तर हसणे ही एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे कामाच्या व्यापातून किंवा ताणातून थोडा वेळ काढून हसण्याची सवय ठेवावी, कारण निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी चेहरा हसरा असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – तब्येत ठणठणीत असूनही कार्डियाक अरेस्ट का येतो? हार्ट अटॅकपेक्षा किती वेगळा?
Comments are closed.