दादरमध्ये CJP आंदोलनाकांवर कारवाई, मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा अन् शिवाजी पार्कला छावणीचे स्वरुप





मुंबई : दिल्लीनंतर रविवारी (11 ऑक्टोबर) मुंबईतही कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी, दादरच्या शिवाजी पार्कला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी करत सीजेपीने शिवाजी पार्कवर आंदोलनाची घोषणा केली खरी पण पोलिसांनी त्याआधीच काही कार्यकर्त्यांना अटक केली. विशेष म्हणजे काही तरुणांकडून विनाकारण अटक केल्याचा दावा करण्यात आला. पण यावेळी दादरच्या रस्त्यांवर पोलिसांची धरपकड आणि आक्रमक झालेल्या तरुणांचे एक भयावह चित्र समोर आले. (Photo Courtsey : Deepak Salvi)



Comments are closed.