पावसाळा संपला, फ्रिजमधून काढून फेका हे पदार्थ





पावसाळ्यात आपण फळं आणि भाज्या खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. कारण पावसाळ्यातील दमट हवेत फळ, भाज्या लवकर खराब होतात. पण पावसाळा संपला असून अजूनही तुमच्या फ्रिजमध्ये जर फळं, भाज्या स्टोअर असतील तर त्या तात्काळ फेकून देणे आणि फ्रीजची डिप क्लीनिंग करणे आवश्यक आहे.

कारण पावसाळा आणि त्यानंतर लगेचच सुरू झालेली ऑक्टोबर हीट यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला असतो. याचा परिणाम हवामानावर झाल्याने जास्त दिवस फ्रिजमध्ये स्टोअर केलेले पदार्थ खराब होऊ लागतात. ड्राय होऊ लागतात. जसे की अर्धा कापलेला सफरचंद, पपई किंवा तत्सम फळ.

तसेच फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या नरम पडल्या असतील सुकत असतील तर त्यातून विचित्र वास येतो. अशा भाज्या वापरू नयेत. कारण या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. त्या फेकून द्याव्या.

तसेच फ्रिजमध्ये  मसाला, ब्रेड, चिरलेल्या भाज्यादेखील याच स्थितीत असतील , बुरशी लागली असेल तर त्याही फेकून द्याव्यात .

सॉस, पनीर, चटणी,मसाले ते ही तपासावे. ज्यांची एक्सापायरी डेट झाली असेल ते तात्काळ फेकून द्यावे. पदार्थांच्या रंगात किंवा वासात जर बदल झाला असेल तर तेही फेकून द्यावे.

अन्यथा हे पदार्थ खाल्ल्यास घरबसल्या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे.



Comments are closed.