वॉर्म होम डेकोरसाठी या टिप्स ठरतील उपयुक्त

घर म्हटलं की मनाला शांतता आणि आराम मिळायला हवा. सध्या धावपळीच्या जीवनशैलीत घराला अधिक सुंदर, प्रसन्न आणि उबदार बनवण्यासाठी वॉर्म होम डेकोरची क्रेझ चांगलीच वाढली आहे. खूप जास्त खर्च न करता आणि भडक रंगाच्या वस्तू न वापरता घर आकर्षक कसे बनवायचे? चला जाणून घेऊया

सौम्य आणि उबदार रंग

भिंतींसाठी अतिशय भडक रंगांऐवजी क्रीम, वॉर्म व्हाईट, बेज, मऊ तपकिरी किंवा ऑलिव्ह ग्रीन यांसारख्या सौम्य रंगांचा वापर करावा. हे रंग घराला नैसर्गिक आणि प्रशस्त स्वरूप देतात.

नैसर्गिक साहित्य

घरात प्लास्टिकच्या किंवा चमकदार वस्तूंपेक्षा लाकूड, बांबू, ताग आणि मातीची भांडी किंवा शोभेच्या वस्तूंचा वापर करावा. लाकडी फर्निचर आणि तागाच्या चटयांमुळे घराला एक पारंपरिक आणि उबदार लुक येतो.

सॉफ्ट फॅब्रिक्स

सोफा आणि बेडसाठी कॉटन किंवा लिननचे कापड वापरावे. मऊ कुशन, हाताने विणलेले आणि हलक्या रंगांचे पडदे यामुळे घरातील वातावरणात एक वेगळाच कम्फर्ट जाणवतो.

नैसर्गिक सूर्यप्रकाश:

घरात पांढऱ्या ट्युबलाइट्सऐवजी वॉर्म टोनच्या लाईट्सचा वापर करावा. तसेच, दिवसा खिडक्यांतून पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि हवा घरात येईल याची काळजी घ्यावी

इनडोअर प्लांट्स

घराच्या कोपऱ्यांमध्ये लहान-मोठी इनडोअर प्लांट्स ठेवावीत. हिरवीगार झाडे घरातील हवेत ताजेपणा आणतात आणि मानसिक शांतता टिकवून ठेवतात.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे घर अधिक सुंदर, उबदार आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले बनवू शकता.

Comments are closed.