101 वे मराठी नाट्य संमेलन बोरिवलीला?

101वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन पुठे होणार हे लवकरच समजेल. नाटय़ परिषदेच्या बोरीवली शाखेला हा मान मिळण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील बोलणी सुरू आहेत. तसेच संमेलनाध्यक्षांचीही लवकरच निवड केली जाणार आहे

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या 100 व्या ऐतिहासिक नाटय संमेलनाचा समारोप रत्नागिरी येथे होणार आहे. तो झाल्यानंतर 101 व्या नाटय़संमेलनाचे बिगुल वाजेल. खरं तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात 100 व्या संमेलनाचा समारोप सोहळा निश्चित करण्यात आला होता, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता जानेवारीच्या अखेरपर्यंत रत्नागिरीत 100 वे नाटय़संमेलनाचा समारोप होऊन मार्च 2026 मध्ये 101 वे नाटय़संमेलन होईल, असे समजते. या संमेलनासाठी नाटय़ परिषदेच्या बोरिवली आणि कोथरूड शाखा इच्छुक आहेत. त्यातही बोरिवली शाखेचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे.

Comments are closed.