घराच्या चाव्या वारंवार हरवतात? ही सोपी सवय लावून घ्या
घरातून बाहेर पडताना नेमक्या चाव्या सापडत नाहीत, कधी त्या पर्समध्ये असतात तर कधी सोफ्याच्या गादीखाली. घाईच्या वेळी चाव्या शोधण्यात वेळ वाया जातो आणि विनाकारण चिडचिडही होते. तुमच्याही घरात चाव्या वारंवार हरवत असतील, तर एक छोटीशी सवय तुमची ही डोकेदुखी कमी करू शकते. त्यासाठी महागड्या गॅजेट्सची गरज नाही, फक्त घरात चाव्या ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी आहेत त्या लावून घेणे उपयोगी ठरेल.
1) चाव्यांसाठी ठराविक जागा
घराच्या मुख्य दरवाजाजवळ चावी ठेवण्यासाठी एक छोटा हुक, की-होल्डर किंवा ट्रे ठेवा. बाहेरून घरी आल्यावर चाव्या थेट तिथेच ठेवा. ही सवय नियमित केल्यास चाव्या शोधण्यासाठी घरभर फिरावे लागणार नाही.
२) की चेन
लहान चाव्या सहज नजरेतून सुटतात. त्यामुळे त्यांना रंगीत किंवा आकाराने थोडे मोठे की-चेन लावा. यामुळे चाव्या टेबलावर, पर्समध्ये किंवा इतर वस्तूंमध्ये शोधणे सोपे होईल.
3) चाव्या वेगळ्या ठेवा
घराच्या चाव्या पाकीट, किराणा सामान किंवा इतर वस्तूंसोबत कुठेही ठेवू नका. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा ठेवल्यास गोंधळ कमी होईल.
4) बाहेर पडण्यापूर्वी…
घरातून निघताना मोबाईल, पाकीट आणि चाव्या या तीन गोष्टी तपासण्याची सवय लावा. दरवाजाजवळ छोटी यादी लावली, तर सुरुवातीला त्याची आठवण ठेवणे आणखी सोपे होईल.
5) चाव्यांचा अतिरिक्त संच
शक्य असल्यास घरातील विश्वासू व्यक्तीकडे चाव्यांचा अतिरिक्त संच सुरक्षित ठेवा. मुख्य चाव्या हरवल्यास किंवा घरात विसरल्यास याचा उपयोग होऊ शकतो.
या छोट्या सवयी रोजच्या जीवनात आणल्यास चाव्या हरवण्याचा त्रास कमी होईल आणि घराबाहेर पडतानाची धावपळही वाचेल.
Comments are closed.