घराचा करू नका दवाखाना

हल्ली सोशल मिडियावर आरोग्यासंबंधी अनेक उत्पादनांच्या जाहीराती येत असतात. यामुळे काहीजण डॉक्टरांचा सल्ला न घेता जाहीरातीत दाखवलेली उत्पादन थेट विकत घेतात. यात प्रामुख्याने शुगर टेस्ट किट, बीपी मशीन, ऑख्सीजन मशीन, सर्दी खोकल्याचे सिरप, सांधेधुखीचे ऑईल, गोळ्या, कॅप्सुल,हिट बेल्ट, मलम, मानेभोवती, कंबरेभोवती , गुडघ्याचा बेल्ट, कॅप अशी अनेक प्रकारच्या गोष्टी, उपकरण प्रत्येक घरात सापडतात. यामुळे आपल्या घराचा दवाखाना केव्हा झाला हे देखील कोणाला कळत नाही.

प्रामुख्याने वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्ती ज्या घरात आहेत. त्या घरात वरती दिलेली उत्पादन १०० ट्कके असतात. कारण कोरोनाच्या लाटेनंतर प्रत्येक व्यक्ती आरोग्याप्रती सजग झाला आहे. जराही तब्येत बिघडली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जाहीराती बघून अशा प्रकारच्या वस्तू, औषध घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. त्यामुळे घरात जागोजागी औषधाच्या बाटल्या, बीपी मशीन, मलम, बेल्टस पडल्याचं चित्र सहज नजरेस पडते. यातील काही गोष्टी खरं तर टिकाऊ देखील नसतात. पण तरीही केवळ आजाराच्या लक्षणात साम्य असल्याचे समजून घेतल्या जातात.

पण अशाप्रकारे योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, टेस्ट करणे हे स्वत:च्या आरोग्याशी खेळण्यासारखेच आहे. शिवाय घरभर या आरोग्यविषयक वस्तूंचा पसारा होत असल्याने घर दवाखा्यासारखे दिसू लागते. शिवाय बऱ्याचवेळा ही उत्पादने स्वस्त असल्याने घेतली जातात. पण त्यांचा दर्जाही हलका असल्याने प्रॉपर रिडींग मिळत नाही. यामुळे नुकसानही होते. त्यामुळे कोणतेही औषधं किंवा वैद्यकीय उपकरणे विकत घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

Comments are closed.