Anti Cancer Superfoods: रोजच्या आहारात या 5 पदार्थांचा समावेश करावा





महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैलीच्या मदतीने कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी केला जाऊ शकतो. आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात असे काही नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरच्या पेशींशी लढण्यास मदत करतात. अशाच 5 महत्त्वाच्या अँटी-कॅन्सर सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि ब्रोकोलीसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटामिन्स असतात. हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींना होणारे नुकसान रोखतात.

अळशी

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि लिग्नॅन्सनावाचे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

लसूण आणि आले

लसूणमध्ये ॲलिसिन नावाचे औषधी तत्व असते, जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. त्यामुळे  रोजच्या जेवणात फोडणीसाठी किंवा आहारात कच्च्या लसणाचा आणि आल्याचा वापर करावा.

हळद

हळदीमध्ये असणारे करक्यूमिनउत्तम अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-कॅन्सर गुणधर्मांनी समृद्ध असते. दुधात किंवा भाजीमध्ये हळदीचा नियमित वापर केल्याने शरीरातील पेशींचे संरक्षण होते.

बेरीज आणि आवळा

स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉलीफिनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून प्रतिकारशक्ती मजबूत करतात.

हेही वाचा – घराचा करू नका दवाखाना



Comments are closed.