World Menopause Day : मासिक पाळी थांबताना शरीरावर अन् मनावर नेमके काय परिणाम होतात?





स्त्रीच्या आयुष्यात वयानुसार अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल घडून येतात. . . . असाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीजोनिवृत्ती. जेव्हा अंडाशयाची कार्यक्षमता मंदावते आणि शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण घटते, तेव्हा मासिक पाळी येणे कायमचे बंद होते. दरवर्षी 18 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पातळीवर वर्ल्ड मेनोपॉज डे (World Menopause Day) म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आरोग्यावरील या बदलांची जाणीव करून देणे आणि त्यावर योग्य व्यवस्थापन कसे करावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

रजोनिवृत्तीचे टप्पे

  1. प्री-मेनोपॉज – वयाच्या 37 ते 38 व्या वर्षापासूनच महिलांना याची सुरुवातीची लक्षणे जाणवू शकतात.
  2. मेनोपॉज – मासिक पाळी पूर्णपणे थांबण्याचा टप्पा.
  3. पोस्ट-मेनोपॉज -मासिक पाळी थांबल्यानंतरचा पुढील काळ.

परिणाम

  • शरीराचे तापमान अचानक वाढल्यासारखे वाटते, त्वचेवर लाली येते व अस्वस्थता जाणवते.
  • झोपेत असताना जास्त घाम आल्यामुळे वारंवार झोप मोड होते, ज्यामुळे चिडचिड आणि थकवा वाढतो.
  • हार्मोनल बदलांमुळे चयापचय क्रिया मंदावते. विशेषतः पोटाच्या भागात आणि कंबरेभोवती चरबी वेगाने साचू लागते.
  • इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका वाढतो.
  • शारीरिक त्रासासोबतच नैराश्य, तणाव, चिडचिड यांसारख्या मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

तज्ज्ञ काय सांगतात?

  • जास्त तणाव किंवा नैराश्य जाणवल्यास कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मदत करू शकते.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतल्यास रात्री घाम येणे किंवा योनिमार्गातील कोरडेपणा यावर आराम मिळतो.
  • दररोज योगासने आणि प्राणायाम अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे मन शांत होते.
  • दररोज हलका व्यायाम किंवा चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होतात.
  • आहारात खनिजे, कॅल्शियम आणि सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश असावा.

हेही वाचा – Belly Button Hygiene: नाभी स्वच्छ करताना घ्या ही काळजी



Comments are closed.