किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी दररोज चालणे का गरजेचे?




पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्यासाठी दररोज चालणे का महत्त्वाचे आहे


वाढत्या वयात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. डिजिटल युगात कॉम्प्युटरसमोर तासनतास बसून राहण्याच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांमध्ये वजन वाढणे, चिडचिड होणे आणि तणाव वाढणे अशा समस्या उद्भवत आहेत. मात्र, दररोज नियमित चालल्याने मुलांचे वजन नियंत्रणात राहण्यासह मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे एका नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

संशोधनातून काय समोर आले?

अभ्यासानुसार, दररोज चालण्याची सवय असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि मूड स्विंग्सची लक्षणे खूप कमी प्रमाणात दिसून आली. संशोधकांच्या मते, जे तरुण दररोज ऍक्टीव्ह असतात, त्यांच्या मेंदूच्या भावना आणि विचार नियंत्रित करणाऱ्या भागांचा विकास अधिक वेगाने होतो.

चालण्याचे फायदे

  • नियमित चालण्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा वाढतो. ज्यामुळे एकाग्रता, निर्णयक्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते.
  • चालण्यामुळे शरीरात एंड्रॉर्फिन आणि डोपामाईनसारखे आनंदी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • दैनंदिन शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणाचा धोका टळतो.

पालकांसाठी टिप्स

  • शाळेत जाताना किंवा येताना शक्य असल्यास चालण्याचा पर्याय निवडावा.
  • लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा.
  • संध्याकाळी किंवा सकाळी 20 ते 30 मिनिटे मैदानात किंवा पार्कमध्ये शतपावली करावी.

हेही वाचा – कमी मीठ खाऊनही बीपी वाढतोय?



Comments are closed.