रणजीच्या इतिहासात 78 वर्षांनी एकाच खेळाडूने केल्या 400 धावा, स्थानिक क्रिकेटमध्ये केली जागतिक कामगिरी
मुंबई : सध्या देशात रणजी क्रिकेट स्पर्धेची धामधूम पाहायला मिळत आहे. अशामध्ये सोमवारी (19 ऑक्टोबर) मिझोरामच्या चिन्मय सुतारने 400 धावा करत इतिहास रचला आहे. त्याने, नागालँडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात 400 धावा केल्या आणि अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, तब्बल 78 वर्षानंतर रणजी सामन्यांमध्ये ही कामगिरी करण्यात आली आहे. चिन्मय सुतार नागालँडविरुद्ध सामन्यात 400 धावा करून नाबाद राहिला. विविध देशांतील स्थानिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 फलंदाजांनी 400 हून अधिक धावा केल्या आहेत.
Comments are closed.