दसऱ्यानिमित्त सजले दादरचे फुलमार्केट, पहा फोटो
मुंबई : दसऱ्याच्या (विजयादशमी) शुभमुहूर्तावर दादरच्या प्रसिद्ध फूल मार्केटमध्ये फुले आणि तोरण खरेदीकरण्यासाठी ग्राहकांनी अलोट गर्दी झाल्याचे चित्र रविवारी (18 ऑक्टोबर) आणि सोमवारी (19 ऑक्टोबर) दिसून आले. दसऱ्याला घराच्या दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची जुनी परंपरा असल्याने मुंबई आणि उपनगरांतून हजारो लोक पहाटेपासूनच दादर पश्चिम येथील मीनाताई ठाकरे फूल बाजार आणि फूल गल्ली परिसरात पोहोचतात. यावेळीही हजारो ग्राहकांनी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य : दीपक साळवी) दसरा 2026 ऑम्लेट
Comments are closed.