'रहना है तेरे दिल में 2' येणार का?




रहना है तेरे दिल में 2 येत आहे की नाही


मैडी आणि रीना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार का? अशी चर्चा चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या लोकप्रिय रोमँटिक चित्रपटाचे विश्व पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी जॅकी भगनानी करत आहेत, असं सध्या सर्वत्र बोललं जात आहे.

रहना है तेरे दिल में  हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान टिकवून आहे.

मिळालेल्या वृत्तांनुसार, या प्रोजेक्टसाठी जॅकी भगनानी चित्रपट निर्माते नितीन कक्कड यांना दिग्दर्शक म्हणून घेण्याचा विचार करत आहेत.

नितीन कक्कड यांचे नाव ‘आवारापन 2’ या चित्रपटाशीही जोडले गेले आहे. मात्र, हा चित्रपट मूळ चित्रपटाचा सिक्वेल असणार की त्याची कथा पूर्णपणे वेगळी असणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सध्या या प्रोजेक्टबाबत केवळ चर्चा सुरू असून, निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – चेतन चावडा दिग्दर्शित ‘बागुलबुवा’ मराठीतील पहिला AI चित्रपट



Comments are closed.