वाढवणसह इतर प्रकल्पांविरोधात 40 हून अधिक संघटनांचा जनआक्रोश; हजारो नागरिकांची उपस्थिती




वाढवणसह इतर प्रकल्पांविरोधात 40 हून अधिक संघटनांचे जनआक्रोश आंदोलन


डहाणू : वाढवण बंदरासह इतर विविध विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज (30 ऑक्टोबर) डहाणूच्या वरोर येथे भव्य जनआक्रोश सभा आणि महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वरोर येथील जनआक्रोश सभेत राजकीय पक्षांसह जवळपास 40 हून अधिक विविध संघटना, मच्छीमार संस्था आणि शेतकरी गट सहभागी झाले आहेत. विकासाच्या नावाखाली पालघर जिल्ह्याची शेती, जंगल, समुद्र आणि स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त होणार असतील, तर असा विकास आम्हाला मान्य नाही, असा स्पष्ट संदेश जनआक्रोश सभेतून देण्यात आला.



Comments are closed.