दिवाळीच्या खरेदीनिमित्त मुंबईकरांची लगबग, दादर मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला असून प्रत्येक घरात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी लगबग सुरु झाली आहे. अशामध्ये दिवाळी आधीच्या रविवारी (1 नोव्हेंबर) हजारो मुंबईकरांनी मुंबईतील प्रसिद्ध दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी, विविध रंगांच्या रोषणाईने तसेच ग्राहकांच्या अथांग गर्दीने दादरचे मार्केट हे फुलून गेले होते. आकर्षक दिव्यांची तोरणे, रंगीबेरंगी विविध पद्धतीचे कंदील, वेगवेगळ्या प्रकाराचे दिवे अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी दादरच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्याचे आकर्षक फोटो पहा… (फोटो सौजन्य : दीपक साळवी)
Comments are closed.