न्यायालयाच्या दणक्यानंतर बीएमसीला जाग; सूर्य उगवताच बुलडोझर कारवाई सुरुवात
बोरीवली : बोरीवली पूर्वेकडे बेस्ट पॉवर सबस्टेशनसाठी राखीव असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे मुंबई महानगरपालिकेला हटवायची होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट 2025 रोजी आदेश दिला होता. मात्र त्यानंतरही मुंबई महानगरपालिकेकडून अतिक्रमणे हटवण्यात आली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि इतर महापालिका अधिकाऱ्यांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारावर स्थगिती आणण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर आज (04 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजल्यापासून बीएमसीने अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.
Comments are closed.