चांदीचे नाणे असली आहे की नकली ? कसं ओळखाल ?
दिवाळी म्हटल की सोन्या चांदीची खरेदी आलीच. त्यातही धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी ,गणेशाच्या प्रतिकृती असलेली चांदीची नाणी आवुर्जून खरेदी केली जातात. त्यांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का काही विक्रेते चांदीमध्ये तांबा, निकल, अॅल्युमिनियम, झिंक आणि कॅडमियमसह इतर धातुची भेसळ करतात. त्यापासून नाणी, बिस्कीट तयार केली जातात. त्यामुळे चांदीची शुद्धता कमी होते. म्हणूनच प्रत्येक जागृक ग्राहकाने चांदी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी.
चांदीचे चकचकीत नाणे शुद्ध असेलच असे नाही. तर चांदीवरील हॉलमार्कमुळे त्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. यामुळे चांदीची शुद्धता तुम्ही घरी आल्यावरही तपासू शकता. पण तरीही चांदीच्या शुद्धतेत शंका वाटल्यास तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे.
बर्फ
चांदी उष्णतेची वाहक आहे. ज्याला शास्त्रीय भाषेत तापीय चालकता म्हणतात. त्यामुळे चांदी असली आहे की त्यात इतर धातुंची भेसळ आहे हे देखील तुम्ही घऱात बसून तपासू शकता. त्यासाठी चांदीचे नाणे किंवा बिस्किट एका समतल जागेवर ठेवावे. त्यावर बर्फाचा लहान तुकडा ठेवावा आणि तो किती वेगाने वितळतो हे तपासावे.
जर नाणे किंवा बिस्किटमध्ये चांदीचे प्रमाण अधिक असेल तर बर्फ लवकर वितळेल. त्यामुळे ती चांदी शुद्ध आहे हे समजण्यास हरकत नाही. पण बऱ्याचवेळा आजबाजूच्या तापमान आणि परिस्थितीचा बर्फ वितळण्याचा वेगावर परिणाम होतो.यामुळे प्राथमिक लक्षण म्हणून चांदी शुद्ध आहे की अशुद्ध याचा अंदाज येतो.
चुंबक
चांदी हा चुंबकीय धातु नाही. त्यामुळे चांदीचे नाणे कींवा बिस्कीट चुंबकाला चिटकत नाही. याचा वापर करूनही तुम्ही चांदीची शु्दधता तपासू शकता.
आवाज
पूर्वीच्या काळी चांदीचे नाणे असली की नकली हे ओळखण्यासाठी ते वाजवून बघत. कारण जर चांदीचे नाणे किंवा बिस्किट असली असेल तर त्याचा खण् असा स्पष्ट आवाज येतो. पण जर चांदीच्या बिस्किटमध्ये इतर धातुंची भेसळ असेल तर त्याचा आवाज बदलतो. काहीवेळा आवाज खणखणीत नसतो.
Comments are closed.