लहान मुलांचे केस पांढरे होण्याचे प्रमाण का वाढतंय?
बदलती लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयींमुळे लहान वयातच केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. एकेकाळी केस पांढरे होणे हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जायचे, परंतु आता 10 ते 15 वर्षांच्या मुलांमध्येही ही समस्या वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे केस अकाली पांढरे होण्यामागे कोणती कारणे आहेत याची माहिती घेऊयात.
पोषणाचा अभाव
अनेक मुले घरातील पौष्टिक जेवणाऐवजी जंक फूड, पॅकबंद पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स आवडीने खातात. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळत नाहीत. शरीर निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२, लोह आणि प्रथिने यांची कमतरता निर्माण झाल्यास केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही, ज्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
मानसिक ताणतणाव
अभ्यासाचा ताण, स्पर्धा परीक्षा, शाळा यांचा लहान मुलांच्या मनावर ताण पडत आहे. वाढत्या मानसिक ताणामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम केसांच्या रंगावर होतो.
अनुवंशिकता
जर कुटुंबात आई-वडील किंवा आजी-आजोबांचे केस अगदी लहान वयात पांढरे झाले असतील, तर अनुवंशिक कारणांमुळे मुलांमध्येही ही समस्या उद्भवू शकते.
केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर
बाजारात उपलब्ध असणारे विविध शाम्पू, तेल, जेल किंवा रंगीत हेअर केअर उत्पादने लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी आणि केसांसाठी घातक ठरू शकतात. यात असणाऱ्या केमिकल्समुळे केस अकाली निर्जीव आणि पांढरे होतात.
प्रदूषण
वाढते प्रदूषण आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे देखील मुलांच्या आरोग्यावर आणि केसांवर वाईट परिणाम होत आहे.
तज्ज्ञांचा सल्ला –
या समस्येवर मात करण्यासाठी पालकांनी मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसेच मुलांवर अभ्यासाचा अतिरीक्त ताण येऊ देऊ नये आणि त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य निरोगी राहील आणि केस काळे व मजबूत राहतील.
हेही वाचा – झोपेत बोलण्याची सवय का लागते? जाणून घ्या कारणे
Comments are closed.