International Men’s Day 2026 : तुमच्या आयुष्यातील स्पेशल पुरुषांना द्या ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात, जी फार काही बोलत नाहीत; पण आपल्या कृतीतून कायम सोबत असल्याची जाणीव करून देतात. कधी वडिलांच्या रूपात डोक्यावर मायेचा हात ठेवतात, कधी भावाच्या रूपात खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, तर कधी नवऱ्याच्या रूपात प्रत्येक सुख-दुःखात साथ देतात. स्वतःच्या भावना बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी धडपडणाऱ्या अशा प्रत्येक खास पुरुषाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे जागतिक पुरुष दिन

दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या आयुष्यातील वडील, भाऊ, पती, मित्र किंवा तुमच्यासाठी खास असलेल्या व्यक्तीला प्रेमाचे दोन शब्द नक्की सांगा. त्यांच्यासाठी खास, हटके आणि मनाला भिडणारे हे 10 शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचा दिवस आणखी खास करा.

जागतिक पुरुष दिनाच्या खास शुभेच्छा संदेश

1) आयुष्यात प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभं राहणाऱ्या, स्वतःपेक्षा आपल्यांचा विचार करणाऱ्या प्रत्येक खास व्यक्तीला पुरुष दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

2) जबाबदाऱ्यांचं ओझं हसत पेलणाऱ्या आणि चेहऱ्यावरचं हास्य कधीही हरवू न देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला सलाम! पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3) तुमची ताकद केवळ तुमच्या शब्दांत नाही, तर तुमच्या प्रेमळ कृतीत आहे. असंच सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहा. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

4) कधी आधार बनून, कधी मित्र बनून, तर कधी मार्गदर्शक बनून आयुष्य सुंदर करणाऱ्या तुम्हाला पुरुष दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

5) स्वप्नं स्वतःची असोत किंवा कुटुंबाची, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक जिद्दी पुरुषाला मानाचा मुजरा!

6) भावना व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दांची गरज नसते, हे तुमच्याकडूनच शिकायला मिळालं. तुमचं असंच प्रेम आणि पाठबळ कायम राहो. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

7) तुमच्या कष्टांना यशाची जोड मिळो, स्वप्नांना नवी भरारी मिळो आणि चेहऱ्यावरचं हसू कायम राहो. जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

8) जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण आमच्यासाठी संपूर्ण जग आहात. तुमचं अस्तित्व असंच खास राहो!

9) खंबीर असणं म्हणजे कधीच न रडणं नाही, तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरणं आहे. तुमच्या या जिद्दीला सलाम! पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

10) आयुष्याच्या प्रत्येक भूमिकेत मनापासून जगणाऱ्या, नाती जपणाऱ्या आणि माणुसकी जपणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Comments are closed.