शेगडीच्या बटणांवरील हट्टी डाग कसे काढाल?




शेगडीच्या बटणांवरील हट्टी डाग कसे काढाल?


स्वयंपाक करताना शेगडीच्या बटणांवर तेल, मसाले आणि चिकट डाग साचतात. अनेकदा शेगडी स्वच्छ केली जाते, पण ही बटणं तशीच राहतात. त्यामुळे त्यावर घाण आणि जंतू जमा होऊ शकतात. परंतू, काही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरून शेगडीची बटणंही स्वच्छ आणि चमकदार ठेवता येतात. पाहूया या सोप्या टिप्स

लिंबू आणि बेकिंग सोडा

  • एका वाटीत बेकिंग सोडा आणि थोडे लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा.
  • ही पेस्ट बटणांवर आणि बटणांच्या जागेवर लावून 15 मिनिटं तशीच ठेवा.
  • जुन्या टूथब्रशने बटणांना घासून स्वच्छ करा.
  • ओल्या कापडाने पुसा.

डिश सोप आणि गरम पाणी

  • एका भांड्यात गरम पाणी आणि डिश सोप मिसळा.
  • टूथब्रशला या साबणपाण्यात बुडवून बटणांच्या कडा आणि जागा स्वच्छ करा.

व्हिनेगर आणि गरम पाणी

  • पांढरे व्हिनेगर आणि गरम पाणी समप्रमाणात मिसळा.
  • या मिश्रणात कापड बुडवून बटणं पुसून घ्या. जास्त घाण असल्यास, टूथब्रशचा वापर करा.

टूथपेस्ट

  • बटणांवर साधी पांढरी टूथपेस्ट लावा.
  • 5 मिनिटं थांबा आणि नंतर ओल्या टूथब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे बटणांना चमकही येईल.

महत्त्वाची टीप

कोणताही उपाय वापरण्यापूर्वी शेगडी पूर्णपणे बंद आणि थंड असल्याची खात्री करावी. बटणांच्या छिद्रांमध्ये जास्त पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

हेही वाचा – जुन्या लोकरीच्या कपड्यांपासून बनवा ‘डोअर मॅट ते सॉफ्ट टॉय’



Comments are closed.