सकाळी फळं खाताना लक्षात ठेवा या गोष्टी
सकाळची सुरुवात आरोग्यदायी व्हावी म्हणून अनेकजण नाश्त्याआधी किंवा नाश्त्यासोबत फळं खाण्याला प्राधान्य देतात. सफरचंद, पपई, केळी, संत्री, पेरू अशी हंगामी फळं शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर देतात. मात्र, फळं खाणं जितकं आरोग्यासाठी चांगलं आहे, तितकंच ती योग्य पद्धतीने खाणंही महत्त्वाचं आहे. कारण काही छोट्या चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
रिकाम्या पोटी फळं खाताना….
प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. काहींना सकाळी रिकाम्या पोटी फळं खाल्ल्याने त्रास होत नाही, तर काहींना आंबट फळांमुळे अॅसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःच्या शरीराला काय मानवतं, हे लक्षात घ्या.
फळांचा रस पिणे टाळा
फळांचा रस काढताना त्यातील बहुतांश फायबर कमी होतं. त्यामुळे ज्यूसऐवजी अख्खी फळं खाण्याची सवय लावा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास मदत होते.
फळं खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा
फळांच्या सालीवर धूळ, माती किंवा कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात. त्यामुळे फळं कापण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवा.
प्रमाणाकडे दुर्लक्ष नको
फळं आरोग्यदायी असली तरी एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात खाणं टाळा. विविध हंगामी फळांचा आहारात समतोल समावेश करा.
फळांसोबत साखर घालू नये
फळांची चव वाढवण्यासाठी त्यावर अतिरिक्त साखर किंवा गोड सिरप घालण्याची गरज नाही. नैसर्गिक चवीतच त्यांचा आनंद घ्या.
सकाळी फळं खाणं ही चांगली सवय आहे. मात्र योग्य निवड, स्वच्छता आणि प्रमाण या तीन गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. संतुलित आहाराचा भाग म्हणून फळांचा समावेश करणे महत्त्वाचे ठरेल.
Comments are closed.