रेल्वे प्रशासन बुलडोझर घेऊन पोहचले, पण प्रभादेवीतील रहिवाशांकडून तोडक कारवाईला जोरदार विरोध
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे 100 झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज (20 नोव्हेंबर) सकाळीच रेल्वे प्रशासन प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीतील घरांवर बुलडोझर फिरवण्यासाठी पोहचली. मात्र नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अजय चौधरी, माहीम विधानसभा आमदार महेश सावंत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर या बांधकामावरील तोडक कारवाई अखेर थांबवण्यात आली.
Comments are closed.