सकाळी रोज ब्रेड-बिस्किटे खाता? अतिसेवनामुळे होतील हे परिणाम

पारंपरिक नाश्ता जसे की पोहे, उपमा हे बाजूला सारत हल्ली बहुतेक घरात बेकरी प्रोडक्ट सकाळच्या नाष्टाला खाल्ले जातात. पण हे बेकारी प्रोडक्ट कितपत तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत ही विचार करण्याची बाब आहे. अनेक स्त्रिया नोकरी करणाऱ्या असल्याने अनेक घरात बेकारी प्रोडक्टला प्राधान्य दिलं जातं. बरेच जणांना ते फार आवडतात. मात्र, आवडतात म्हणून त्यांचं सेवन फार प्रमाणात करुन चालणार नाही. संयम न ठेवता जास्त प्रमाणात हे प्रोडक्ट खाल्ल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

वजन वाढणे

रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्याने त्यातील उच्च ग्लायसेमीक इंडेक्स असल्यानेमुळे  तुमचं वजन वाढू शकत.

चरबी वाढणे

व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात . ज्यामुळे चरबी वाढते.  कोलेस्ट्रॉल – व्हिटॅमिन इ आणि फायबर असलेला ब्रेड अति प्रमाणात खाल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

हृदयविकाराचा धोका

सतत रिकाम्या पोटी बेकरी प्रॉडक्ट खाल्याने ह्रदयविकाराचा धोका निर्माण होतो.

यकृत

पांढऱ्या ब्रेडमध्ये जास्त प्रमाणात ग्लूटेन असतं . ज्याने यकृताला हानी पोहोचू शकते.

पोट फुगणे

व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर सोडियम असल्याने पोट सतत फुगलेले जाणवते.

पोषक घटकांची कमतरता

नाश्त्यात सतत बेकरी पदार्थ खाल्ल्यामुळे फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिने यांसारख्या पौष्टिक पदार्थांकडे दुर्लक्ष होऊ शकते. परिणामी आहारातील पोषक घटकांचे संतुलन बिघडू शकते.

हेही वाचा – लहान मुलांना दूध बिस्किट ब्रेड द्यावे का?

Comments are closed.