IND vs Pak : नाणेफेकीवेळीच मोठा ड्रामा; समदने ‘हेड्स’ म्हटले, पण रेफरीने ‘टेल्स’ पुकारले; नेमकं काय घडलं?




२०२६ आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान नाणेफेकीतील प्रमुख नाटक


नवी दिल्ली : क्रिकेटमधील दोन कट्टर विरोधी संघ म्हणजे भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ आज (22 नोव्हेंबर) आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमध्ये दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ‘आशिया कप रायझिंग स्टार्स 2026’ स्पर्धेतील सामना खेळवला जात आहे. मात्र आजच्या सामन्यात टॉसच्या वेळी एक वाद निर्माण झाला. मॅच रेफरीने सुरुवातीला टॉसचा निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केला, ज्यावर पाकिस्तान ‘अ’चा कर्णधार अब्दुल समद याने त्वरित आक्षेप घेतला. त्यानंतर रेफरीने लगेच आपली चूक सुधारली.



Comments are closed.