पुरुषांच्या या 5 सवयी देतात कॅन्सरला निमंत्रण
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. मात्र, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे कॅन्सरचा आणखी धोका वाढू शकतो. विशेषतः पुरुषांच्या आहारापासून ते व्यसनांपर्यंतच्या काही सवयी आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे वेळीच या सवयी बदलणे गरजेचे आहे. जाणून घेऊया पुरुषांच्या अशा 5 सवयी आहेत, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
तंबाखू आणि धुम्रपान
पुरुषांमध्ये कॅन्सर वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. सिगारेट, बिडी, गुटखा यांसारखी उत्पादने फुफ्फुस, तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरला थेट आमंत्रण देतात. त्यामुळे या व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहणेच उत्तम ठरेल.
मद्यपान
अल्कोहोलचे अतिसेवन यकृत (Liver), स्वादुपिंड (Pancreas) आणि घशाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. मद्यपानाचे प्रमाण कमी करणे किंवा ते पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
चुकीचा आहार
आहारात फळे, भाज्या, फायबरचा अभाव आणि जंक फूड, प्रक्रिया केलेले मांस यांचे अतिसेवन कोलोरेक्टल कॅन्सरला कारणीभूत ठरते.
व्यायामाचा अभाव
बैठी जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीराचे वजन वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. नियमित व्यायाम केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.
सुर्यप्रकाशात वावर
कामाच्या निमित्ताने उन्हात जास्त वेळ राहणाऱ्या पुरुषांना त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. दुपारी उन्हात जाणे टाळावे आणि बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा.
तज्ज्ञांचा सल्ला
कॅन्सरवर मात करण्यासाठी लवकर निदान महत्त्वाचे आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पुरुषांनी नियमितपणे पूर्ण शरीर तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा – बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या पसंतीस उतरतोय अमृता खानविलकरचा ‘अमूल्य’
Comments are closed.