“शब्द वाया जाणार असतील तर बोलूच नये”, तेजश्री प्रधानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे कायमचं प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. सध्या तेजश्री वीण ही दोघांतली तुटेना या मालिकेत काम करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तेजश्रीने एका मुलाखतीत केलेल्या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता तिचे हे विधान पुन्हा चर्चेत आले आहे.

तेजश्री प्रधानने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कुठं बोलावं आणि कुठे नाही याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. आता ते पुन्हा चर्चेत आलंय.
ती म्हणाली होती की, ‘आपला श्रोता कसा आहे त्यावर अनेक गोष्टी असतात’.
‘काही वेळा दादा म्हणाला तसं जिथं तुझे शब्द बोलून वाया जाणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि मुळात ते आपल्याला आधी कळावं लागतं. त्यामुळे अशा ठिकाणी बोलूच नये’.
पुढे ती म्हणाली की, ‘मी तशी रोकठोक आहे. मला वाटतं तिथे मी बोलते. पण कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे’.
‘जर आपले शब्द आपल्यावरच पुन्हा बाऊंस होणार असतील तर तिथे थांबलेलं बरं असतं’, असंही ती म्हणाली.

हेही वाचा – ‘मला मिळालेले पुरस्कार मी भंगारात दिले..’; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

Comments are closed.