बाल्कनीपासून लिव्हिंग रूमपर्यंत; घराच्या सजावटीसाठी वापरता येतील स्टोन्स
घर सुंदर आणि आकर्षक दिसावे यासाठी महागड्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. बाजारात सहज उपलब्ध असणारे रंगीबेरंगी स्टोन्स वापरूनही घराला हटके आणि सुंदर लूक देता येतो. या स्टोन्सचा वापर करून तुम्ही घरातील कोपरे, बाल्कनी, कुंड्या आणि टेबल सजवू शकता. जाणून घेऊया घराच्या सजावटीसाठी स्टोन्स वापरण्याच्या ८ सोप्या टिप्स
१) घरातील झाडांच्या कुंड्यांमध्ये मातीवर रंगीबेरंगी स्टोन्स पसरवा. यामुळे कुंड्यांना आकर्षक लूक मिळेल.
२) साध्या स्टोन्सवर ऍक्रेलिक रंगांनी फुले, पाने, फुलपाखरे किंवा मंडला आर्ट काढा. हे रंगवलेले स्टोन्स शोपीस म्हणून वापरता येतात.
३) काचेच्या पारदर्शक बाऊलमध्ये वेगवेगळ्या रंगांचे स्टोन्स भरून त्यामध्ये सजावटीची मेणबत्ती ठेवा. सेंटर टेबलवर ही सजावट सुंदर दिसते.
४) जुन्या फोटोफ्रेमच्या कडांना छोटे स्टोन्स चिकटवा. यामुळे साध्या फोटोफ्रेमलाही आकर्षक लूक मिळेल.
५) बाल्कनीतील झाडांच्या आजूबाजूला पांढरे किंवा नैसर्गिक रंगाचे स्टोन्स लावा. यामुळे छोट्या जागेतही सुंदर गार्डनचा अनुभव मिळेल.
६) सपाट आणि एकसारख्या आकाराचे स्टोन्स वापरून कप किंवा ग्लास ठेवण्यासाठी कोस्टर तयार करा. त्यासाठी स्टोन्स मजबूत बेसवर चिकटवा.
७) बाथरूममधील एका कोपऱ्यात काचेच्या भांड्यात स्टोन्स ठेवा. त्यासोबत छोट्या कृत्रिम रोपांचा वापर केल्यास स्पासारखा सुंदर लूक मिळेल.
८) वेगवेगळ्या आकारांचे स्टोन्स वापरून फुलपाखरू, झाड किंवा फुलांची कलाकृती तयार करा. फ्रेममध्ये बसवून भिंतीवर लावा.
हेही वाचा – Kitchen Hacks : किचनमधली छोटी कामं सोपी करणारे स्मार्ट हॅक्स
Comments are closed.