लहान मुलांच्या मालिशसाठी कोणते तेल योग्य?





घरात लहान बाळाचे आगमन झाले की त्याच्यासाठी काय करावं आणि काय करू नये असे घरातल्यांना होते. कारण घरात चिमुकला पाहुणा आल्याचा आनंदच इतका असतो की त्याची योग्य काळजी घेण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू होते. यात पहीला प्रश्न सगळ्यांना सतावतो तो म्हणजे बाळाची मालिश कोणत्या तेलाने करावी. कारण बाळाची त्वचा नाजुक आणि संवेदनशील असते. त्यामुळे ते सगळे लक्षात घेऊनच तेलाची निवड करावी लागते.

आपल्याकडे बाळ बाळंतिणीला मालिश करण्याची पिढ्यान पिढ्या पद्धत आहे. मालिशमुळे आईच्या स्नायूंना आराम मिळतो. गर्भारपण आणि बाळंतपण याने महिलांचे शरीर थकलेलं असते. अशावेळी मालिशमुळे स्नायूंना आराम मिळतो. ते लवचिक होतात. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे महिलांचा बाळंतपणात आलेला थकवा कमी होतो. तर बाळाचे शरीर नाजुक असते.

नारळाचे तेल
मालिशमुळे स्नायूंना आराम मिळतो. ते शांत झोपते. यामुळे काहीजण बाळाच्या मालिशसाठी नारळाचे तेल वापरतात. शक्यतो विना रंग व सुगंध असलेले तेल बाळासाठी वापरावे. कारण यात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर करण्यात आलेला नसतो.

मोहरीचे तेल-(सरसो तेल)
उत्तर आणि पूर्व भारतात बाळाच्या मालिशसाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात. पण मोहरीचे तेल उष्ण असते. त्यामुळे बाळाला दाह होऊ शकतो.

तीळ , बदाम
आपल्याकडे अनेक घरात तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. यात नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट गुण आहेत. बदामच्या तेलात हलके रसायनदेखील मिसळलेले असते. तिळाचा गुणधर्म उष्ण आहे. बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला एलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हे तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सूर्यफूलाचे तेल
बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्यावर तेल लावण्यास डॉक्टर नकार देतात. पण सूर्यफूलाचे तेल आणि मिनरल तेल असे पर्याय तुम्ही मुलांसाठी वापरू शकता. सूर्यफूलाचे तेल संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित असल्याने ते बाळास मालिश करण्यास वापरावे. तसेच मिनरल ऑईल म्हणजेच लिक्विड पैराफीन त्वचेवर सुरक्षित थराचे काम करतं त्यामुळे त्वचा मुलायम राहते. यामुळे मुलांच्या मालिशसाठी सूर्य़फूलाचे आणि मिनरल तेल वापरणे योग्य आहे.

मात्र बाळाच्या मालिशसाठी तेल विकत घेताना त्यावरील सगळी माहीती वाचावी. रंगीत आणि सुगंधी तेल वापरणे टाळावे. कारण त्यात रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो.



Comments are closed.