11 IPS officers transferred and 5 officers promoted in Maharashtra


राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बढती देऊन बदल्या केल्या आहेत. त्यात पाच पोलीस अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली असून त्यापैकी काहींना त्याच ठिकाणी बदली दाखविण्यात आली आहे.

News By अरुण सावरटकर

मुंबई : राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बढती देऊन बदल्या केल्या आहेत. त्यात पाच पोलीस अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली असून त्यापैकी काहींना त्याच ठिकाणी बदली दाखविण्यात आली आहे. शुक्रवारी गृहविभागाने अकरा आयपीएस पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. या अकरापैकी पाच पोलीस अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. (11 IPS officers transferred and 5 officers promoted in Maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून संबंधित पोलीस अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आलेल्यांमध्ये राज्याच्या सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांची त्याच विभागातील रिक्तपदी, नागरी हक्क संरक्षण विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची राज्याच्या कारागृह व सुधारसेवा विभागात, राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांची विशेष अभियान विभागात, राज्याच्या आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम मल्लिकार्जुन यांची राज्याच्या प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा, समर्थनाचा प्रश्नच नाही; दानवे काय म्हणाले?

तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभाग, महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश मेखला यांची मुंबईख्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली दाखविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देताना त्याचठिकाणी, तर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक भगवान त्रिमुखे यांचीही तिथे बदली दाखविण्यात आली आहे.

गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची बुलढाणाच्या खामगावात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या मनोजकुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, पुण्याच्या राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक आर. बी डहाळे यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, तर पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांची पुण्याच्या मोटार परिवहन विभागात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.