लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, 11 जणांना घेतला चावा

चाकूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील बोथी चौकात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर पाहायला मिळत आहे. याच रोडवरील बस स्थानक आणि शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांचा चावा घेतला आहे.

शहरासह तालुक्यातील अनेक गावात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. मोकाट कुत्र्यामुळे शहरवासीय हैराण झालेले आहेत. मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहे. शहरातील मुख्य मार्ग असो, बाजारपेठ असो किंवा गल्ली बोळातील रस्ते असोत मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात दिसतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असो किंवा बाजारपेठ शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट कुत्रे असो, यामुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. आतापर्यंत या कुत्र्यांनी 11 जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.