द्रमुकच्या याचिकेवर 11वी 'सर्वोच्च' सुनावणी
नवी दिल्ली:
तामिळनाडूतील द्रमुक सरकारने राज्यात एसआयआर करविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयो याचिकेवर 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्याची तयारी दाखविली आहे.
द्रमुकच्या वतीने वरिष्ठ वकील विवेक सिंह यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायाधीश विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी केली, ज्यानंतर खंडपीठाने याचिकेला मंगळवारी सूचीबद्ध करणार असल्याचे सांगितले. द्रमुकचे संघटन सचिव आर.एस. भारती यांनी आयोगाकडून तामिळनाडूत मतदार यादी फेरपडताळणी (एसआयआर) करण्याच्या निर्णयाच्या विरोधात 3 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एसआयआर प्रक्रिया घटनाविरोधी, मनमानी आणि लोकशाहीच्या अधिकारांसाठी धोका असल्याचा दावा द्रमुकने केला आहे. द्रमुकने याचिकेत आयोगाच्या अधिसूचनेला रद्द करण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.