लीलावती रुग्णालयात काळी जादू, माजी विश्वस्तांवर 1200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचाही

मुंबईतल्या सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. लीलावती रुग्णलायात काळी जादू केली असून माजी विश्वस्तांनी 1200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. लीलावतीच्या आजी विश्वस्तांनी हा आरोप केला असू रुग्णालयात मानवी हाडं आणि केसांनी भरलेले ८ कलश सापडले आहेत. या घटनेचा तपास सुरू असून रुग्णालयाचे माजी 8 विश्वस्तांसह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. लीलावती रुग्णालय विश्वस्ताचे कार्यकारी संचालक आणि मुबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंगळवारी एक पत्रकर परिषद घेतली. सिंह यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की गेल्या 20 वर्षात माजी विश्वस्तांनी या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले. या गैरव्यवहारामुळे रुग्णालयावर परिणाम झालाच त्यात आता काळी जादू केल्याचेही समोर आले आहे.
माजी विश्वस्तांनी उपचाराचे यंत्र, फर्नीचर, कॉम्प्युटर, रुग्णवाहिका, औषधांच्या खरेदीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप विश्वस्तांनी केला आहे. जमीन आणि रुग्णालयसंदर्भातील व्यवहारात अनियमितता, विश्वस्त आणि खासगी कंपन्यांशी हात मिळवूण निधी लाटल्याचा आरोप सध्याच्या विश्वस्तांनी केला आहे.
फक्त आर्थिक गैरव्यवहारच नाही तर रुग्णालयात काळी जादू केल्याचाही आरोप विश्वस्तांनी केला आहे. विश्वस्तांच्या कार्यालयाचे टाईल्स तोडले गेले त्यात मानवी हाडं आणि केस सापडले. या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण गुन्ह्याची नोंद न झाल्याने कोर्टाने स्वतःच तपास करायचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.