गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूंना केईएममध्ये मिळणार मोफत उपचार; उभे राहणार 12 मजली स्पोर्टस् इंज्युरी, रिहॅब आणि रिसर्च सेंटर

खो-खो, कबड्डी, क्रिकेट, मल्लखांब असो किंवा कुठलाही खेळ. गंभीर दुखापत झाल्यास अनेकदा परदेशात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागतात. परंतु आता अशा गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूंना केईएम रुग्णालयातच मोफत उपचार मिळू शकणार आहेत. कारण, केईएममध्ये तब्बल 12 मजली अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले स्पोर्टस् इंज्युरी, रिहॅब आणि रिसर्च सेंटर उभे राहणार आहे. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला.

पश्चिम हिंदुस्थानात अशाप्रकारचे स्पोर्टस् इंज्युरी, रिहॅब आणि रिसर्च सेंटर पुठेच नाही. या सेंटरचा लाभ गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकातील खेळाडूंनाही घेता येणार आहे. देशभरात अशी सहा पेंद्रे आहेत. त्यात आता सेठ जी. एस. मेडिकल  कलेज आणि केईएम रुग्णालयातील केंद्राची भर पडणार आहे, अशी माहिती ऑर्थोपेडीक स्पोर्टस् इंज्युरी सर्जन डॉ. रोशन वाडे यांनी दिली. भूमिपूजनाला केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई, अतिरिक्त आयुक्त डॉ. बीपीन शर्मा आणि पालिका उपायुक्त शरद उगाडे, डॉ. अतुल पंघटे, डॉ. संदीप सोनोने, डॉ. सुनील भोसले, डॉ. प्रदीप नेमाडे उपस्थित होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. बालपृष्ण इंडस्ट्रीजचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष अरविंद पोद्दार आणि विजयालक्ष्मी पोद्दार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

उपचारानंतर चाचणी घेण्यासाठीचीही सुविधा

कुठलाही खेळ असू द्या, उपचारानंतर त्या खेळाडूला नीट धावता येतेय की नाही, त्याला उडी मारता येतेय की नाही, पाण्याखालचे ट्रेडमील, त्याला नीट पोहता येतेय की नाही, बॅटिंग, बॉलिंग किंवा मल्लखांब, फुटबॉल, बास्केटबॉल कुठल्याही प्रकारातील खेळाडूंना उपचारानंतर फिटनेसची चाचणी घेता येणार आहे. त्यासाठी अद्ययावत आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशी जागा इमारतीत असणार आहे. तब्बल 15 हजार चौरस फुटात ही इमारत उभी राहणार आहे.

Comments are closed.