पन्हाळगडावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी साप आढळल्याने गोंधळ

ऐतिहासिक पन्हाळगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13-डी थिएटरचे उद्घाटन झाले. मात्र, मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी एका खुर्चीच्या बाजूला साप आढळल्याने मोठा गोंधळ उडाला.

पन्हाळगडावर 4 ते 7 मार्चपर्यंत ‘किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सव’ सुरू आहे. ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’, ‘पन्हाळगडावरून सुटका’ हा लघुपट आणि 13-डी थिएटरचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी गोंधळ उडाला. कार्यक्रमस्थळी लोकांसाठी खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. एका खुर्चीच्या बाजूला साप आढळला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून कार्यक्रमाला उपस्थित एका सर्पमित्राने साप पकडला आणि वनअधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. दरम्यान, किल्ले पन्हाळगडावर होणाऱ्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे, देशभक्तीपर गीते सादर होणे अपेक्षित होते. मात्र, हिंदी फिल्मी गीतांचा भडीमार करण्यात आला.

Comments are closed.