कोलंबियामध्ये झालेल्या भूकंपात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
570 हून अधिक जण जखमी : 86 इमारती कोसळल्या : 1500 हून अधिक घरांचे नुकसान : 7 विमानतळांवरील कामकाज बंद
वृत्तसंस्था
बोगोटा
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये सोमवारी रात्री झालेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. तसेच 570 हून अधिक जण गंभीर झाले आहेत. अधिकाऱ्यांनुसार देशभरात 86 इमारती कोसळल्या आहेत, तर 1500 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 18 आरोग्य केंद्रे आणि 52 शाळांनाही नुकसान पोहोचले आहे.
भूकंपाच्या परिणामादाखल 7 विमानतळांवरील कामकाज रोखण्यात आले असून 5 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोलंबियाच्या अध्यक्षांनी आपत्कालीन समितीची बैठक बोलावत मदत अन् बचावकार्यावरील देखरेख सुरू केली आहे.
परेरामध्ये सर्वाधिक जीवितहानी
कोलंबियाच्या परेरा शहरातच 60 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेले हे शहर भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 64 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. राजधानी बोगोटा समवेत अनेक शहरांमध्ये देखील तीव्र धक्के जाणवले आहेत. खबरदारीदाखल लोक इमारतींमधून बाहेर पडत रस्त्यांवर पोहोचले होते.
चोको अन् रिसाराल्डामध्येही हानी
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेनुसार भूकंपाचे केंद्र चोको भागातील सॅन जोसे डेल पालमारनजीक होते. तर भूकंपाचे केंद्र जमिनीत 107 किलोमीटर खोलवर होते. बोगोटाच्या महापौरांनी प्रभावित भागासाठी 6 संकलन केंद्रे सुरू केली असून तेथे पाणी, ब्लँकेट, पाकिटबंद खाद्यपदार्थ, हायजीन सामग्री आणि प्रथमोपचार साहित्य जमविले जात आहे. प्रभावित शहरांमध्ये मदत आणि बचाव अभियानासाठी बोगोटा येथून 100 बचाव कर्मचाऱ्यांना पाठविण्याची तयारी आहे.
भूकंपप्रवण क्षेत्रात समावेश
कोलंबिया हा जगातील सर्वाधिक भूकंप प्रभावित देशांपैकी एक आहे. येथे दरवर्षी हजारहून अधिक भूकंपाचे धक्के जाणवत असतात. कोलंबिया हा देश रिंग ऑफ फायर नावाच्या भूकंप अन् ज्वालामुखीसाठी संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. येथील नाजका, कोकोस आणि दक्षिण अमेरिका यासारखी नावे असलेल्या अनेक टेक्टॉनिक प्लेट्स परस्परांना धडक असतात. यातील एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली खचत असते, याचमुळे भूगर्भात सातत्याने हालचाली होत राहतात.
Comments are closed.