19 चौकार, 12 षटकारांसह 250 धावांची 14 वर्षांच्या कैफ मोहम्मदची तुफानी खेळी

भारताला अजून एक नवा वैभव सूर्यवंशी मिळाला आहे. ज्याने घरेलु क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत डबल शतक झळकावत 250 धावा केल्या आहेत. त्याने या शानदार पारीमध्ये 19 चौकार आणि 12 षटकार झळकावले आहेत. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे तो फक्त 14 वर्षांचा फलंदाज आहे. 14 वर्षांच्या या मुलाने देहरादून येथे खेळल्या गेलेल्या अंडर 14 राज सिंग डूंगरपूर या स्पर्धेमध्ये त्याच्या फलंदाजीमध्ये तुफानी खेळी केली आहे. ज्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आताच कानपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये कैफची निवड युपी अंडर14 संघात झाली होती. 3 ते 5 मे रोजी पर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात कैफने त्याची मेहनत सिद्ध केली. कैफने त्याच्या फलंदाजीदरम्यान 377 मिनिटे मैदानावर घालवली. तसेच 66 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कैफचे वडील मजदूरी करतात. याचबरोबर कैफच्या कुटुंबात एकूण 8 माणसे राहतात आणि तो त्या सर्वांमध्ये सर्वात लहान आहे.

Comments are closed.